Diwali gift to MHADA employees, Rs 20,000 sanitary grant | म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान

म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान

मुंबई : म्हाडा कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीमध्ये २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. बुधवारी म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाºयांना १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा यात तीन हजारांनी भर पडली आहे.
राज्यभरामध्ये म्हाडाच्या विविध मंडळांतील विभागांमध्ये सुमारे अडीच हजार कर्मचारी काम करतात. यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, उपअभियंता(स्थापत्य व विद्युत), साहाय्यक विधि सल्लागार, विधि साहाय्यक, लेखाधिकारी, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी, साहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत) या पदांची तर लघुटंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक, अभियांत्रिकी साहाय्यक, भूमापक, वायरमन आदी विविध पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाºयांना २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने यंदा म्हाडा कर्मचाºयांची दिवाळी चांगली साजरी होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Diwali gift to MHADA employees, Rs 20,000 sanitary grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.