Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारा तुमच्या ‘रिस्क’वर… BMC प्रशासन ‘नॉट रिस्पॉन्सिबल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:40 IST

तरण तलावांमध्ये १ लाख ३९ हजाराहून अधिक मुंबईकरांची नोंदणी केली आहे.

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेने मुंबईकरांसाठी शहर व उपनगरात १३ जलतरण तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर पोहावे, अपघात किंवा दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नसल्याची तरतूद नियमावलीत आहे. विहित शुल्क भरुनही पोहणाऱ्यांना जीवरक्षक आणि वैद्यकीय उपलब्ध होणार नसतील, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आहे.

तरण तलावांमध्ये १ लाख ३९ हजाराहून अधिक मुंबईकरांची नोंदणी केली आहे. येथे विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेचे सुरक्षा रक्षक असूनही अपघात घडल्याच्या घटना आहेत.

जनजागृतीसाठी पीपीपीचा आधार?

पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी पालिकेने पालिकेने १० जलतरण तलाव सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने खासगी संस्थांना देण्याचा विचार केला. त्यानुसारदादर-वडाळा विभागातील तलाव वगळता इतर सर्व खासगी संस्थेकडे सोपविले जाणार होते. या योजनेतून संस्था व महापालिकेला नफ्याचा प्रत्येकी निम्मा हिस्सा मिळणार होता. महापालिका सध्या जलतरण तलावांच्या देखभालीसाठी मोठा खर्च करीत असली, तरी त्यातून पुरेसा महसूल मिळत नाही. त्यामुळे हे स्विमींग पूल तोट्यात चालत आहेत. या पार्श्वभूमीवर, पीपीपी पद्धत दोघांनाही फायदेशीर ठरणार आहे, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र ही योजना अजून अंमलात येवू शकलेली नाही.

पोहणाऱ्यांची नोंदणीप्रवर्ग    संख्या

  • सर्वसाधारण    ७८,७६९
  • विद्यार्थी    ४५,९०३
  • जेष्ठ नागरिक    ११,१७६
  • पालिका कर्मचारी    २,५५०
  • दिव्यांग    ७७४

मुंबई महापालिकेचे तरण तलाव

कांदिवली (पश्चिम), चेंबूर, दादर पश्चिम, मुलुंड पश्चिम, अंधेरी पश्चिम, दहिसर पश्चिम, मालाड पश्चिम, वडाळा, गिल्बर्ट हिल - अंधेरी पश्चिम, वरळी, विक्रोळी, अंधेरी पूर्व, दहिसर पूर्व

English
हिंदी सारांश
Web Title : Swim at your own risk; BMC not responsible for accidents!

Web Summary : Mumbai's BMC offers 13 swimming pools, but users swim at their own risk. The BMC isn't responsible for accidents, raising concerns about safety despite fees. Over 139,000 people are registered, including students and seniors. PPP model was considered, but not implemented yet.
टॅग्स :पोहणेमुंबई