निराधारांची दिवाळी झाली गोड; चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 06:31 PM2020-11-13T18:31:07+5:302020-11-13T18:31:23+5:30

या वर्षी दिवाळीच्या अनुषंगाने सणाचं औचित्य साधत घाटकोपर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Distribution of educational materials from the Child Development Foundation | निराधारांची दिवाळी झाली गोड; चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप

निराधारांची दिवाळी झाली गोड; चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप

googlenewsNext

मुंबई - बाल दिन व दिवाळी एकाच तारखेला येत असल्याच्या निमित्ताने चाईल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने निराधार व गरजवंत मुलांची दिवाळी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं आहे. गेली पाच वर्ष हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. निराधार मुलांचे संगोपन करण्यासाठी ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. जी मुले खरोखरच निराधार आहेत अशा गरजवंत मुलांना शिक्षणाकरिता मदत केली जाते.

या वर्षी याच अनुषंगाने दिवाळीचे औचित्य साधत घाटकोपर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक दिपक हांडे, संतोष खरात, राजू घुगे, स्नेहा खुराडे, चंद्रमणी जाधव, चंद्रकांत कुंजीर व इतर मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेचे सर्वेसर्वा विशाल गारगोटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतो. त्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली की, समाजात कित्येकांना मदतीची गरज असते त्यातच बालपण हे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी योग्य मदत व दिशा मिळाली तर बालपणाला एक चांगले वळण लागू शकते. कित्येक मुलांना ते निराधार असल्याने योग्य मदत मिळत नाही व ते गुन्हेगारीकडे वळतात. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा समाजाचा एक घटक मानून त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे तर त्यांचे आयुष्य सुखकर केले पाहिजे. यातूनच समाजाचे व देशाचे हित साधलं जातं.

यावेळी मुलांना दप्तर, पुस्तके, कंपास पेटी, नोटबुक्स, एवढेच नव्हे तर खेळणी सुद्धा भेट म्हणून देण्यात आली. यामुळे दिवाळीमध्ये त्यांच्या ओठावर हास्य उमलले. गेली दहा वर्ष ही संस्था सामाजिक क्षेत्रात आरोग्य , शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मोरया इंटरटेनमेंटच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. याचाच भाग म्हणून पद्मश्री अनुप जलोटा, पद्मभूषण जाकीर हुसेन, पद्मभूषण अमजद अली, पद्मश्री शुभा मुग्दूल, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व महेश काळे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सहायता निधी उपलब्ध केला आहे. 

 

Web Title: Distribution of educational materials from the Child Development Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.