शिंदेंकडून आमदाराची नाराजी दूर, 'स्वीकृत नगरसेवक' पदी शिंदेसेनेतून राज सुर्वे, बाळकृष्ण ब्रीद?
By मनोहर कुंभेजकर | Updated: February 23, 2026 10:27 IST2026-02-23T10:26:42+5:302026-02-23T10:27:24+5:30
मुंबई महापालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांपैकी शिंदेसेनेला दोन स्वीकृत नगरसेवक मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

शिंदेंकडून आमदाराची नाराजी दूर, 'स्वीकृत नगरसेवक' पदी शिंदेसेनेतून राज सुर्वे, बाळकृष्ण ब्रीद?
-मनोहर कुंभेजकर, मुंबई
मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सध्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिंदेसेनेतून युवासेना कार्यकारिणी सदस्य राज सुर्वे आणि माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांपैकी शिंदेसेनेला दोन स्वीकृत नगरसेवक मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार प्रकाश सुर्वे मुलाला नगरसेवक पदाचे तिकीट न दिल्याने नाराज असल्याची चर्चा होती. आता शिंदेंकडून नाराजी दूर केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
सोमवारी पक्षनिहाय कोट्याप्रमाणे दहा स्वीकृत नगरसेवकांची यादी मुंबई महापालिका आयुक्तांकडे राजकीय पक्षांकडून सादर करण्यात येईल. पालिका आयुक्तांकडून यादी छाननी करण्यात आल्यानंतर महापौर दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे पालिका सभागृहात जाहीर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्वीकृत
नगरसेवकपदी सध्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिंदेसेनेतून युवासेना कार्यकारिणी सदस्य राज सुर्वे आणि माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांपैकी शिंदेसेनेला दोन स्वीकृत नगरसेवक मिळणार असल्याचे बोलले जात आहे.