Join us  

खंडित वीज पुरवठ्यामागे घातपात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 7:53 PM

Power Outage : उच्चस्तरीय चौकशी; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई : मुंबई आणि ठाण्यात सोमवारी  वीज पुरवठा होण्यामागे खंडित घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी दिली. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कळवा पडघे ४०० के व्ही वीज वहिनीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेला त्रासाला सामोरे जावे लागले.खंडित वीज पुरवठयाची चौकशी करताना तांत्रिक बाबी तपासून घेण्यात येणार आहेत. वीज सुरक्षा साधनांची व उपाय योजनांचे ऑडिट करण्यात येणार आहे. यावर अहवाल सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, २०११ साली अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित झाला होता. यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने अहवाल सादर करून अशा घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यावर अंमलबजावणी झाली किंवा नाही हे तपासून बघण्यात येणार आहे, यासाठी कृती अहवाल मागवला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने सुद्धा यावर एक समिती नेमली आहे. ही समिती ही सध्या मुंबईच्या भेटीवर आहे. वीज ठप्प होण्यामागील कारणांचा शोध घेत आहे.---------------------भाजपने मौन का साधलेयंत्रणेत बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असतात. याला पक्ष, सरकार वा देशही अपवाद नाही. वीज पुरवठा खंडित झाल्याने भाजपने याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रकार केलेला आहे, असे राऊत यांचे म्हणणे आहे. भोपाळमध्ये ११ ऑक्टोबरला सहा तास वीज नव्हती. तेव्हा भाजपने मौन का साधले? असा प्रश्नही त्यांनी विचारला.---------------------मुंबई आणि अंधार२०१४ ते २०१९ या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत.जून २०१८ मध्ये मुंबई अनेक तास रात्री अंधारात होती.जून २०१६, डिसेंबर २०१७ या काळातही वीज पुरवठा ठप्प झाला.---------------------

 

टॅग्स :भारनियमनवीजमुंबईमहावितरणमहाराष्ट्र