मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीच्या रेल्वे स्थानकावरील खासदार निधीतून मिळालेल्या आसनांवर खासदारांची नावे दिसत असल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता १० मार्चपासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीच्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आसनावर आणि कचरा पेट्यावर खासदारांची नावे चिकटपट्ट्यांनी झाकण्यात आली होती. मात्र या चिकटपट्ट्या निखळल्याने राजकीय नेत्यांची नावे दिसून येत आहे. राजकीय नेत्यांच्या नावाच्या फलकावर टाकलेला पडदा उडाल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आचारसंहितेचा भंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 01:31 IST