Join us

महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त, शरद पवारांना अजून एक मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 10:19 IST

Sharad Pawar: मविआ सरकार कोसळणं हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र मविआ सरकार कोसळून काही दिवस उलटत नाही तोच शरद पवार यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे.

मुंबई - २०१९ मध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. हे सरकार स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. मविआ सरकार कोसळणं हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र मविआ सरकार कोसळून काही दिवस उलटत नाही तोच शरद पवार यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे वर्चस्व आहे. दरम्यान, या वर्चस्वाला धक्का देताना भारतीय कुस्ती संघटनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पवारंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांना धक्का बसला आहे.  

टॅग्स :शरद पवारकुस्तीमहाराष्ट्र