Disha Salian case dishas father satish salian has filed complaint against three people | दिशा सालियन प्रकरण: दोन युट्युबरसह अभिनेत्यावर ‘एफआयआर’ दाखल होणार

दिशा सालियन प्रकरण: दोन युट्युबरसह अभिनेत्यावर ‘एफआयआर’ दाखल होणार

- गौरी टेंबकर-कलगुटकर 

मुंबई : दिशा सालियन (२८) च्या मृत्यूनंतर तिची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती वडिलांनी पोलिसांना केली होती. त्यानुसार तिघांची नावेही त्यांनी पोलिसांना दिली असून यात दोन युट्युबर तसेच एका अभिनेत्याचा समावेश आहे. मालवणी पोलीस लवकरच या तिघांवर दखलपात्र (एफआयआर) गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब मालवणी पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. जबाबात एक अभिनेता व दोन युट्युबरची नावे त्यांनी दिली आहेत. दिशा मृत्यूपूर्वी गरोदर असल्यापासून ती मालवणीच्या रिजंट गॅलेक्सी इमारतीवरून खाली कोसळल्यानंतर तिच्या अंगावर कपडे नव्हते अशा अनेक अफवा त्यांनी पसरविल्या, असा दिशाच्या वडिलांचा आरोप आहे. मालवणी पोलीस याबाबत कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करत असून त्यानुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. दिशाबाबत काही माहिती असल्यास त्याची माहिती मालवणी पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून संबंधित क्रमांकही देण्यात आले आहेत. मात्र अद्याप अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती पुढे आलेली नाही, त्यामुळे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूरज पांचोलीचीही लेखी तक्रार
वर्सोवा पोलीस ठाण्यात अभिनेता सूरज पांचोली यानेही लेखी तक्रार दिली असून एका अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख त्याने यात केला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप दखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर या अभिनेत्याने पांचोली आणि दिशा सालियनबाबत चुकीचा, बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता; जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याचा नाहक मनस्ताप पांचोली व दिशाच्या कुटुंबाला सहन करावा लागत असल्याचा आरोप लेखी तक्रारीत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Disha Salian case dishas father satish salian has filed complaint against three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.