एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा संभ्रमच, संघटनेला हवी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:04 AM2018-06-08T01:04:08+5:302018-06-08T01:04:08+5:30

तब्बल ४८ महिन्यांनंतर घोषित झालेल्या वेतनवाढीनंतरदेखील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. वेतनवाढ फसवी असल्याचा दावा करत मान्यताप्राप्त संघटनेने बुधवारी महामंडळाकडे चर्चेची मागणी केली.

Discussion of salary hike of ST workers; | एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा संभ्रमच, संघटनेला हवी चर्चा

एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा संभ्रमच, संघटनेला हवी चर्चा

Next

मुंबई : तब्बल ४८ महिन्यांनंतर घोषित झालेल्या वेतनवाढीनंतरदेखील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. वेतनवाढ फसवी असल्याचा दावा करत मान्यताप्राप्त संघटनेने बुधवारी महामंडळाकडे चर्चेची मागणी केली. दुसरीकडे महामंडळ घोषित केलेल्या वेतनवाढीवर ठाम आहे. यामुळे राज्यातील १ लाखाहून अधिक एसटी कामगारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ दिल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. मात्र सातव्या वेतन आयोगामध्ये वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के व घरभाडे भत्ता दर ८, १६, २४ असा आहे. महामंडळाने वार्षिक वेतनवाढीचा दर २ टक्के केला असून घरभाडे भत्ता दर ७, १४, २१ असा दिलेला आहे. त्याचबरोबर १ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१८ या २६ महिन्यांची थकबाकी ४८ समान हफ्त्यांत देण्यात येईल, असे सांगितले. तथापि २०१६-२०२० चा वेतन करार संपल्यानंतरही २०२२ पर्यंत थकबाकी दिली जाईल, याला कामगार संघटनेचा विरोध आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ वेतनश्रेणीवरील कर्मचाºयांना थकबाकी मिळणार नसल्याचे महामंडळाने दिलेल्या प्रस्तावात स्पष्ट केले आहे.
परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २०१६-२०२० या कालावधीसाठी ४ हजार ८४९ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ही वेतनवाढ मान्य नसलेल्या कामगारांनी ९ जूनपर्यंत लेखी फॉर्म भरून द्यावे. वेतनवाढ मान्य नसल्यास चालक-वाहकांनी राजीनामा दिल्यास, त्यांना २० हजार रुपयांच्या मानधनावर ५ वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने सेवेत सामावून घेतले जाईल, अशी धमकी देत कामगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र एसटी संघटनेने दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
आॅडिओ क्लिप व्हायरल
७ जून मध्यरात्रीपासून अन्यायाविरुद्ध सर्वांनी एकत्र या हक्कासाठी एकत्र लढा, कामगार एकजुटीचा विजय असो’ अशा आशयाचे पोस्टर समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. याचबरोबर आॅडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली असून यात ७ जूनच्या मध्यरात्रीपासून
संप करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते.

फसवी पगारवाढ अमान्य
मंत्री रावते यांनी जाहीर केलेल्या ४ हजार ८४९ कोंटीच्या पॅकेजची वेतनवाढ फसवी असल्याने ती अमान्य केली आहे. वेतनवाढ मान्य न करणाºया कर्मचाºयांना राजीनामा देण्याची धमकीवजा मुभा देऊन हिटलरशाहीचे प्रदर्शन केले आहे.
- जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस

निर्णय महामंडळ आणि संघटनेने घ्यावा
मान्यताप्राप्त संघटनेने माझ्याशी चर्चेसाठी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. चर्चा करण्याबाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवर महामंडळ, संघटनेने घ्यावा. मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. ज्यांना वेतनवाढ अमान्य असेल त्यांनी तसे लिहून द्यावे. वेतनवाढीचे प्रकरण औद्योगिक न्यायालयात प्रलंबित आहे.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष

सगळ्यात मोठी वाढ
आतापर्यंतची सगळ्यात मोठ्या रकमेची ही वेतनवाढ आहे. वेतनवाढीचा निर्णय झाला आहे. ९ जूनपर्यंत वेतनवाढ मान्य नसल्यास फॉर्म भरून द्यावा.
- रणजितसिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Web Title: Discussion of salary hike of ST workers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.