ललितला रुग्णालयातून डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:24 AM2018-06-13T06:24:59+5:302018-06-13T06:24:59+5:30

बीडमधील पोलीस शिपाई ललिता साळवे यांची लिंगबदल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 Discharge from Lalit Hospital | ललितला रुग्णालयातून डिस्चार्ज

ललितला रुग्णालयातून डिस्चार्ज

Next

मुंबई - बीडमधील पोलीस शिपाई ललिता साळवे यांची लिंगबदल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर तो ललित म्हणून त्याची खरी ओळख घेऊन रुग्णालयाबाहेर पडला. सहा महिन्यांनंतर त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
बीडची रहिवासी असलेल्या ललिता साळवे २०१० मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात महिला शिपाई म्हणून रुजू झाल्या. साळवेमध्ये जन्मत:च मुलांप्रमाणे हार्मोन्स होते. वयात आल्यानंतर त्यांना आपण मुलगी नसून मुलगा आहोत, असे वाटत होते. अखेर वर्षभरापूर्वी त्यांनी पोलीस खात्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागितली होती. संघर्षानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी ग्रीन सिग्नल मिळाला. सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झालेल्या ललितावर २५ मे २०१८ रोजी लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी ललिता ही ललित अशी नवी ओळख घेऊन बाहेर पडली.
खरी ओळख घेऊन बाहेर पडलो
ललित याने सांगितले की, माझी खरी ओळख घेऊन मी बाहेर पडत असल्याने याचा मला अभिमान आहे. वर्दी घालून कामावर रुजू होण्याकडे लक्ष लागले आहे. ललिता म्हणून जगताना खूप कठीण आणि खडतर प्रवासाला तोंड दिले. यातून बाहेर पडण्यासाठी २०१४ पासून धडपड सुरू झाली. या लढ्यात प्रचंड संघर्ष होता. मात्र, अखेर मी ललित झाल्यामुळे आनंदी आहे. तू पूर्ण फिट झाला असून कामावर रुजू होऊ शकतो, असे डॉक्टर कधी सांगतात, याकडे लक्ष लागले आहे. ६ महिन्यांनंतर पुन्हा दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत येईल. तोपर्यंत रोजचे आयुष्य सुरळीत सुरू होईल.

Web Title:  Discharge from Lalit Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.