Join us

पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्रीय सेवेत परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 02:50 IST

Subodh Jaiswal : पोलीस दलात केलेल्या बदल्या जयस्वाल यांना पटत नव्हत्या. या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका, असेही जयस्वाल यांना सांगितल्याचे समजते.

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांचा केंद्रात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  जयस्वाल यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे  व गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केलेल्या विनंतीला हिरवा कंदील मिळाला आहे. पोलीस दलात केलेल्या बदल्या जयस्वाल यांना पटत नव्हत्या. या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका, असेही जयस्वाल यांना सांगितल्याचे समजते. नक्षलग्रस्त भागात नियुक्ती सक्तीची हवी, असाही जयस्वाल यांचा आग्रह होता. त्यात २२ आयपीएस अधिकारी नक्षलग्रस्त भागात गेलेच नाहीत, असेही त्यांनी सांगितले होते. जयस्वाल हे केंद्रात होते, त्यानंतर ते मुंबईत आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे विनंती करून जयस्वाल यांना राज्यात परत आणले. त्यांना १ जुलै २०१८ रोजी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा मान देण्यात आला.

टॅग्स :पोलिस