दिनकर रायकर यांना जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:37 IST2020-01-07T04:36:55+5:302020-01-07T04:37:02+5:30

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा मानाचा २०२० चा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना जाहीर झाला

 Dinkar Raiker's Lifetime Achievement Award | दिनकर रायकर यांना जीवनगौरव पुरस्कार

दिनकर रायकर यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा मानाचा २०२० चा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना जाहीर झाला असून मुंबईत लवकरच पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रायकर यांनी इंग्रजी आणि मराठी राजकीय पत्रकारितेमध्ये केलेल्या अर्धशतकी कारकिर्दीबद्दल त्यांची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली आहे. ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्षही आहेत. एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी, तरुण भारतच्या पत्रकार जान्हवी पाटील आणि लोकसत्ताचे पत्रकार संजय बापट यांची राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे, असे संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी सांगितले.

Web Title:  Dinkar Raiker's Lifetime Achievement Award