दिंडोशी विभागासाठी आता नव्या सुसज्य रुग्णवाहिकेची सुविधा, राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:11 IST2025-09-16T18:09:45+5:302025-09-16T18:11:44+5:30

या रुग्णवाहिकेचे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते, शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी अनावरण करण्यात आले. या प्रसंगी मनसे सरचिटणीस नयन कदम तसेच मनसेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Dindoshi department now has a new well-equipped ambulance facility, worship was performed by Raj Thackeray | दिंडोशी विभागासाठी आता नव्या सुसज्य रुग्णवाहिकेची सुविधा, राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले पूजन

दिंडोशी विभागासाठी आता नव्या सुसज्य रुग्णवाहिकेची सुविधा, राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले पूजन

मुंबई :दिंडोशी विभागातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत मनसेचे दिंडोशी विभाग अध्यक्ष भास्कर परब यांनी गरजूंसाठी सुसज्ज नवीन रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या रुग्णवाहिकेचे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते, शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी अनावरण करण्यात आले. या प्रसंगी मनसे सरचिटणीस नयन कदम तसेच मनसेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसे दिंडोशी विभागात मार्च २०१६ पासून रुग्णवाहिका सेवा सुरू असून, ती अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरली आहे. आता नव्याने उपलब्ध झालेली ही रुग्णवाहिका आणखी सुसज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सेवा पुरविण्यास सक्षम आहे.

या उपक्रमाबद्दल दिंडोशीकरांनी भास्कर परब यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि दिंडोशीकरांसाठी ही सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
 
Web Title: Dindoshi department now has a new well-equipped ambulance facility, worship was performed by Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.