दिलीप कुमार यांची रोगप्रतिकारशक्ती झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 06:42 IST2020-12-08T06:42:39+5:302020-12-08T06:42:58+5:30

Dilip Kumar : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.

Dilip Kumar's immune system is weak | दिलीप कुमार यांची रोगप्रतिकारशक्ती झाली कमी

दिलीप कुमार यांची रोगप्रतिकारशक्ती झाली कमी

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
दिलीप कुमार यांची सध्या प्रचंड काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनामुळे त्यांना विलगीकरणातच ठेवण्यात आले असून, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे सायरा बानो यांनी सांगितले. काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होतेय, पण तब्येत स्थिर आहे, असे सायरा बानो यांनी सांगितले, तसेच दिलीपजींसाठी प्रार्थना करा, असे आवाहन केले. 
‘लोकांनी माझे कौतुक करावे किंवा मला चांगले म्हणावे, यासाठी मी दिलीप कुमार यांची काळजी घेत नाही. त्यांची काळजी घेण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. त्यांचा सहवास माझ्यासाठी सर्वात प्रिय गोष्ट आहे. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे,’ असेही सायरा बानो म्हणाल्या.

Web Title: Dilip Kumar's immune system is weak