'Veere Di Wedding'चं नवीन बोल्ड पोस्टर पाहिलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 16:45 IST2018-05-19T16:35:51+5:302018-05-19T16:45:35+5:30

बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम कपूरच्या वेडिंगनंतर आता 'वीरे दी वेडिंग'ची जोरदार चर्चा आहे.

Did you see a new bold poster of 'Veere Di Wedding'? | 'Veere Di Wedding'चं नवीन बोल्ड पोस्टर पाहिलं का?

'Veere Di Wedding'चं नवीन बोल्ड पोस्टर पाहिलं का?

मुंबई - बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम कपूरच्या वेडिंगनंतर आता 'वीरे दी वेडिंग'ची जोरदार चर्चा आहे. सोनम कपूर, करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांचा आगामी सिनेमा 'वीरे दी वेडिंग'च्या मजेशीर ट्रेलर-पोस्टर्सनंतर एक नवीन बोल्ड व हॉट पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या नवीन पोस्टरमध्ये गर्ल गँग समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढत असताना दिसत आहेत. या पोस्टरमध्यचे सोनम आणि करीना बिकिनी ड्रेसमध्ये दिसत आहेत तर शिखा व स्वरा आकर्षक मोनॉकनीमध्ये पाहायला मिळत आहेत. सिनेमातील हिरोईन्सचा बोल्ड लूक असलेल्या या पोस्टरवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडत आहे. 

सोनमनं बिकिनीसोबत ट्राउजर परिधान केले आहे तर करीना कॉपर शेड बिकिनी ड्रेसमध्ये अतिशय मनमोहक दिसत आहे. 
'वीरे दी वेडिंग' सिनेमा 1 जून रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. याच दिवशी सोनमचा सख्खा भाऊ हर्षवर्धन कपूरचा 'भावेश जोशी' सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बॉक्सऑफिसवर भाऊ विरुद्ध बहीण असा सामना पाहायला मिळणार आहे. 

रिया कपूर आणि एकता कपूर या सिनेमाचे निर्माते आहेत. तर शशांक घोषनं सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमामध्ये गर्ल गँगशिवाय अभिनेता सुमित व्यासचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दरम्यान, सोनमच्या लग्नानंतर रिलीज होणारा हा तिचा पहिला सिनेमा असून दुसरीकडे तैमुरच्या जन्मानंतर करीनादेखील 'वीरे दी वेडिंग' सिनेमाच्या निमित्तानं मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.  


 



 

Web Title: Did you see a new bold poster of 'Veere Di Wedding'?