उद्धवसेनेच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या पक्षाने बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्या आणि त्या फुटल्याची चर्चा सुरू झाली. मुंबईतील प्रभाग क्रमांक १५७ मधून डॉ. सरिता म्हस्के विजयी झालेल्या आहेत. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी भूमिका स्पष्ट केली.
नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या उद्धवसेनेकडून बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला गैरहजर होत्या. त्या गैरहजर राहिल्याने या चर्चेला तोंड फुटले.
सरिता म्हस्केंबद्दल परबांनी काय सांगितले?
डॉ. सरिता म्हस्के यांच्याबद्दल बोलताना अनिल परब यांनी सांगितले की, "नगरसेविका सरिता म्हस्के या आमच्या संपर्कात आहेत. त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कौटुंबिक कारण सांगितले आहे. पुढील एका महिन्यापर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. त्यामुळे डॉ. सरिता म्हस्के यांची नोंदणी होईल."
"डॉ. सरिता म्हस्के यांनी दिलेले कारण आम्ही कोकण विभागीय आयुक्तांना सांगितले आहे. पुढील एका महिन्यात त्या आल्या नाही, तर काय कार्यवाही करायची याबाबत पक्षश्रेष्ठीच ठरवतील, पण ती वेळ येणार नाही", असे अनिल परब यांनी सांगितले.
महापौर उद्या कळेल -परब
मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण उद्या निघणार आहे. त्याबद्दल अनिल परब म्हणाले की, "देवाच्या मनात काय आहे, हे उद्या सकाळी ११ वाजता कळेल. महापौर पदाचे आरक्षण जाहीर होऊ द्या, उमेदवार ठरू द्या मग पाहू काय करायचे."
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेचे ६५ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. उद्धवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर असून, तिसऱ्या क्रमांकावर शिंदेसेना आहे.
त्यामुळे सध्या मुंबईत दबावाचे राजकारण होतानाही दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांच पक्षाकडून आपापल्या नगरसेवकांवर लक्ष ठेवले जात आहे.
Web Summary : Rumors swirled about corporator Sarita Mhaske's defection after she missed a key meeting. Anil Parab clarified Mhaske is in contact, citing family reasons for her absence. Her registration is pending, and the party will decide further action if needed. The mayoral election outcome is eagerly awaited.
Web Summary : पार्षद सरिता म्हस्के के एक महत्वपूर्ण बैठक में अनुपस्थित रहने के बाद दलबदल की अफवाहें उड़ीं। अनिल परब ने स्पष्ट किया कि म्हस्के संपर्क में हैं, और उनकी अनुपस्थिति का कारण पारिवारिक है। उनका पंजीकरण लंबित है, और जरूरत पड़ने पर पार्टी आगे की कार्रवाई तय करेगी। महापौर चुनाव के नतीजे का इंतजार है।