राज्यात नवीन २ हजार ७७१ कोरोनाबाधितांचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:29+5:302021-02-05T04:30:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शुक्रवारी २ हजार ७७१ नवीन काेराेनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ...

Diagnosis of 2 thousand 771 new corona infections in the state | राज्यात नवीन २ हजार ७७१ कोरोनाबाधितांचे निदान

राज्यात नवीन २ हजार ७७१ कोरोनाबाधितांचे निदान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शुक्रवारी २ हजार ७७१ नवीन काेराेनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख २१ हजार १८४ झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण बाधितांपेक्षा कमी होते. दिवसभरात २ हजार ६१३ रुग्ण बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख २५ हजार ८० रुग्ण काेरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२८ टक्के एवढे आहे. सध्या ४३ हजार १४७ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यभरात शुक्रवारी ५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे. आतापर्यंत ५१ हजार लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४४ लाख ९६ हजार ३५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख २१ हजार १८४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार १२७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर २ हजार ७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

....................

Web Title: Diagnosis of 2 thousand 771 new corona infections in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.