धारावीकरांचा 'लोक विकास'! कल्याणकारी योजनेअंतर्गत ३०० हून अधिक कुटुंबांना वैद्यकीय विम्याचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:38 IST2024-12-06T17:37:48+5:302024-12-06T17:38:41+5:30

धारावी सोशल मिशनच्या (DSM) 'लोक विकास' या उपक्रमाद्वारे धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांची महत्वाच्या सरकारी कल्याणकारी योजनांअंतर्गत नोंदणी झाली आहे.

Dharavi People Development More than 300 families benefited from medical insurance under the welfare scheme | धारावीकरांचा 'लोक विकास'! कल्याणकारी योजनेअंतर्गत ३०० हून अधिक कुटुंबांना वैद्यकीय विम्याचा लाभ

धारावीकरांचा 'लोक विकास'! कल्याणकारी योजनेअंतर्गत ३०० हून अधिक कुटुंबांना वैद्यकीय विम्याचा लाभ

मुंबई

धारावी सोशल मिशनच्या (DSM) 'लोक विकास' या उपक्रमाद्वारे धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांची महत्वाच्या सरकारी कल्याणकारी योजनांअंतर्गत नोंदणी झाली आहे. १९ ऑक्टोबर आणि १६ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या दोन 'लोक विकास' कार्यक्रमांतून १९७ व्यक्तींनी नावनोंदणी केली असून काहींना अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. परिसरातील तीनशेहून अधिक कुटुंबांना या उपक्रमाने या आधीच १० कोटी रुपयांचा (अंदाजे) वैद्यकीय विमा लाभ मिळवून दिला आहे.

जेथे बहुसंख्य लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, त्या भागात आयुष्मान भारत, ई-श्रम कार्ड आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासारखे कल्याणकारी कार्यक्रम अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करतात. तथापि, जागरूकतेचा अभाव आणि सायबर गुन्ह्यांबद्दलची भीती यासारखी आव्हाने अनेकदा रहिवाशांना हे लाभ मिळवण्यापासून वंचित ठेवतात.

उमेश सोनार या सहभागी झालेल्या व्यक्तीने, ते स्वतः आणि त्यांची पत्नी पुष्पा यांच्यासाठी, लोक विकासने आयुष्मान भारतमध्ये नोंदणी प्रक्रिया कशी सुलभ केली याबाबत सांगितले. “अगोदर आम्ही आधारचा गैरवापर होण्याची भीती आणि सायबर गुन्ह्यांबाबतची चिंता यामुळे नोंदणी करण्यास घाबरत होतो. मात्र 'डीएसएम'च्या मदतीमुळे आम्हाला सुरक्षित वाटले आणि याबाबतचा आत्मविश्वासही वाढला.”

या कार्यक्रमाचा प्रभाव फक्त नावनोंदणीपुरता मर्यादित नसून त्याही पलीकडे पोहचला आहे. अनेकांना हा कार्यक्र्म आवश्यक सामाजिक संरक्षणासाठी जीवनरेखा वाटू लागला आहे. “मी ई-श्रम कार्ड योजनेत नाव नोंदवले आणि प्रक्रिया सुरळीत वाटू लागली. बऱ्याच लोकांना या फायद्यांबद्दल माहिती नसते, परंतु आम्ही चुकू नये हे 'लोक विकास' सुनिश्चित करतो”, असे स्वयंपाकी असलेल्या ४८ वर्षीय सिलारबी शेख म्हणाल्या.

धारावी सोशल मिशनचा सर्वसमावेशक दृष्टिकोन रहिवाशांना भेडसावणाऱ्या अडथळ्यांना दूर करून, कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी मोफत, सुरक्षित सहाय्य देऊ करतो. सामाजिक कार्यकर्त्या भाग्यलक्ष्मी यांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “अनेक लोकांसाठी या योजना म्हणजे सुरक्षा जाळ्या आहेत. त्यातून कोणीही मागे राहणार नाही याची डीएसएम काळजी घेत आहे."

Web Title: Dharavi People Development More than 300 families benefited from medical insurance under the welfare scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई