Join us  

धनंजय मुंडेंची 'रघुभाय'स्टाईल, 'वास्तव' लुकची सोशल मीडियात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 7:55 PM

राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात आपली आणि पक्षाची भूमिका मांडताना धनंजय मुंडेंना नेहमीच महाराष्ट्राने पाहिले आहे.

मुंबई - विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर, आता लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठीही ते गावदौरे करत आहेत. नेहमी साधा-सरळ भांग पाडून कपाळी टीळा लावणाऱ्या धनंजय मुंडेंचा आजच्या सभेत वेगळाचा लुक पाहायला मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील सभेनंतर धनंजय मुंडेंचा हा लुक चर्चेचा विषय बनला आहे. धनुभाऊचा हा लुक संजुबाबासारखा म्हणजे वास्तवमधील रघुभायसारखा असल्याचीही चर्चा होत आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात आपली आणि पक्षाची भूमिका मांडताना धनंजय मुंडेंना नेहमीच महाराष्ट्राने पाहिले आहे. आक्रमकपणे आणि विशिष्टपूर्ण शैलीतील भाषणामुळे ते महाराष्ट्रातील तरुणाईचा प्रसिद्ध चेहरा बनले आहे. त्यामुळे, साहजिकच त्यांचे राहणीमान, त्यांची शैली, बोलण्याची पद्धत हेही चर्चेत असते. नेहमीच कार्यकर्ते त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी आपले वजन घटविल्याची चर्चा होती. धनंजय मुंडेंवर सभांमुळे आणि स्टार प्रचारक असल्यामुळे ताण पडत आहे. त्यातूनच, त्यांनी आपले वाढलेलं वजन डाएट करुन कमी केल्यांच समजतं. त्यामुळे त्यांनी वजन घटवल्यानंतर त्याच्या फिटनेसची चर्चा होत होती. त्यानंतर, आता धनंजय मुंडेंच्या नव्या हेअरस्टाईलची चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडेंचा नवा लुक हा वास्तव चित्रपटातील संजय दत्तासारखा असल्याचंही अनेक कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे. धनंजय मुंडेंचा हा व्हिलन टाईप लूक चर्चेचा विषय बनला आहे. भाजपा-राष्ट्रवादीसाठी सध्या राजकीय व्हीलन असलेल्या धनंजय मुंडेंचा नवा लूक त्यांच्या कार्यकर्त्यांना भावला आहे. धनुभाऊचा लूक बघितलं का ? अशी चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. तर, अनेकजण धनुभाऊ बनले रघुभाई असं म्हणताना दिसत आहेत. ऐन मतदानाच्या एक दिवस अगोदर मुंडेंनी बदललेला लूक कोणासाठी इशारा तर नव्हे ना ? अशीही चर्चा होत आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडेंनी बीड मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्या बीड मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर, 23 मे रोजीच धनंजय मुंडें पंकजा आणि प्रतिम मुंडेंसाठी खऱ्या अर्थाने व्हीलन ठरले का नाही, ते समजणार आहे. 

टॅग्स :धनंजय मुंडेव्हायरल फोटोज्निवडणूकलोकसभामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019