'देवेंद्र फडणवीसांनी 'ती' आकडेवारी जाहीर करावी, जनतेची दिशाभूल करु नये'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:48 PM2020-05-26T22:48:02+5:302020-05-26T22:51:19+5:30

ठाकरे सरकारवर होणाऱ्या हल्ल्यांना खासदार संजय राऊत एकटे तोंड देत असताना परब यांनी पहिल्यांदाच विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं

'Devendra Fadnavis should release statistics, not mislead the people' prithviraj chavan MMG | 'देवेंद्र फडणवीसांनी 'ती' आकडेवारी जाहीर करावी, जनतेची दिशाभूल करु नये'

'देवेंद्र फडणवीसांनी 'ती' आकडेवारी जाहीर करावी, जनतेची दिशाभूल करु नये'

googlenewsNext

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वादाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारचं पॅकेज आणि राज्य सरकारला केंद्राकडून देण्यात येणाऱ्या पैशांबाबतही फडणवीस यांनी आकडेमोड केली आहे. त्यानंतर, आता महाविकास आघाडीचे नेते फडणवीस यांना प्रश्न विचारत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना आकडेवारी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जनतेची दिशाभूल करू नये, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. 

ठाकरे सरकारवर होणाऱ्या हल्ल्यांना खासदार संजय राऊत एकटे तोंड देत असताना परब यांनी पहिल्यांदाच विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून आलेली मदत आणि राज्य सरकारला दिलेले सल्ले यावरून परब यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यात फक्त तुम्हालाच अर्थगणित कळत नाही, असं म्हणत परब फडणवीसांवर बसरले. तर, पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्र सरकारचे “कर्जाधारित” पॅकेज म्हणजे जणू काही राज्याच्या तिजोरीत रक्कम हस्तांतरित झाली आहे, असे भासवून जनतेची दिशाभूल करू नये, असा टोलाच लगावला. 

''राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी केंद्राच्या वतीने कर्ज किती व रोख खर्च किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी. केंद्र सरकारने अनेक अटी व शर्तींसह जाहीर केलेले “कर्जाधारित” पॅकेज म्हणजे जणू काही राज्याच्या तिजोरीत रक्कम हस्तांतरित झाली आहे, असे भासवून जनतेची दिशाभूल करू नये.'', असे ट्विट पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यासोबत, एक पत्रही चव्हाण यांनी शेअर केलं आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये येऊ शकतात, असं गणितच चव्हाण यांनी मांडलं आहे.


 
दरम्यान, राज्याला केंद्रानं पूर्ण सहकार्य केलं असून भरीव मदत दिली आहे, असं म्हणत फडणवीस यांनी मोठीच्या मोठी यादीच वाचून दाखवली. त्या आकडेवारीची पोलखोल उद्याच केली जाईल, असंदेखील परब म्हणाले. महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं काम करतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अहोरात्र कष्ट करून सर्व तज्ज्ञांशी बोलून कोरोना संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीची सविस्तर पोलखोल, सविस्तर चिरफाड अतिशय सोप्या भाषेत उद्या राज्यातल्या जनतेसाठी सरकारच्या वतीनं करण्यात येईल, असं परब म्हणाले.

CoronaVirus News: फडणवीस, उद्याच तुमच्या आकडेवारीची चिरफाड करू; ठाकरेंचा 'खास माणूस' अ‍ॅक्शन मोडमध्ये

गंजलेल्या तोफांमधून हल्ले कसे होणार?; संजय राऊत यांची टीका

माणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले

 

Web Title: 'Devendra Fadnavis should release statistics, not mislead the people' prithviraj chavan MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.