Join us

"आता कसं वाटतंय...?", फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् आपलं सरकार आलं तर काय होतं? हेही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 16:24 IST

राज्यात आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधांविना दहीहंडी साजरी होत आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

मुंबई-

राज्यात आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधांविना दहीहंडी साजरी होत आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील जांभोरी मैदानानंतर मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी फडणवीसांनी गोविंदांना संबोधित केलं. 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

आपलं सरकार आलं आणि दहीहंडी देखील जोरदार होतेय, आता कसं वाटतंय? मोकळं मोकळं वाटतंय ना?, अस फडणवीसांनी गोविंदांनाच विचारलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही आता गोविंदा राहिलेले नाही, तुम्हा आता खेळाडू झालेले आहेत, असं म्हटलं. त्यानंतर गोविंदांनी एकच जल्लोष केला. 

मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

"पाऊस सुरू होतोय आणि बघा आपलं सरकार आलं तर काय होतं? आपलं सरकार आलं तर दहीहंडी जोरदार, गणेशोत्सव जोरदार, नवरात्री जोरात आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, आता तुम्ही फक्त गोविंदा नाहीत. तुम्ही खेळाडू आहात. आता तुम्हाला खेळाडूचे सर्व लाभ दिले जाणार आहेत. या ठिकाणी कुणी जखमी होऊ नये, जर झाला, तर सरकार आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय? मोकळं मोकळं वाटतंय ना, छान छान वाटतंय ना", असं फडणवीस म्हणाले.  

"आपण सर्वांनी मिळून बलशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. म्हणून आता आपण विकासाच्या हंडीतून राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे. खऱ्या अर्थानं विकास शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे हेच आपलं ध्येय आहे", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसदहीहंडी