मुंबई : मुंबईचेपोलिस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारती यांनी बुधवारी संध्याकाळी मुंबई पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणे हाताळली आहेत. त्यात २६/११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पत्रकार जे. डे हत्याकांडाचा समावेश आहे. भारती यांनी 'इंडियन मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेचे नेटवर्क मोडून काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देवेन भारती यांना मार्चमध्ये लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मुंबईकरांच्या सुरक्षेला माझे प्राधान्य राहील, तसेच सायबर गुन्ह्यांचे आव्हान लक्षात घेता, ते रोखण्यासाठी मुंबई पोलिस दल सज्ज आहे. प्रभावी जनजागृती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
देवेन भारती, मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त