लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विकासकांकडून प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. मुंबईतील सध्याची प्रदूषणाची पातळी पाहता महापालिकेने कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. १ डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान पालिकेने ६ लाख ९० हजारांचा दंड वसूल केला आहे. चेंबूर, विक्रोळी, माहुल येथील विकासकामांच्या ठिकाणी प्रदूषण नियमांचे उल्लंघन सर्वाधिक असून पालिकेने १ लाख ३० हजारांचा दंड आकारला आहे.
वायुप्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ ला महापालिकेने २८ मुद्द्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यासाठी वॉर्ड स्तरावर एकूण ९४ भरारी पथकांची नियुक्ती केली. मात्र, वर्ष उलटूनही विकासक आणि प्राधिकरणाकडून त्यांचे पालन झालेले नाही. अनेक बांधकामस्थळी सात दिवसांची नोटीस बजावल्यानंतरही मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे पालिका पर्यावरण विभागाकडून काम बंद करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतरही मार्गदर्शक तत्त्वे लागू न केल्यास दहा हजार रुपये दंड लागू केला जातो. निवडणुकीनंतर या दंडात वाढ करून ती एक लाखापर्यंत करण्यात येणार आहे.
वांद्रे पूर्वेतून कचरा जाळण्याच्या तक्रारी
१ डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान उघड्यावर कचरा जाळल्यामुळे पालिकेने मुंबईकरांकडून ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याच्या सर्वाधिक तक्रारी वांद्रे पूर्व, सांताक्रूझ पूर्व, तसेच खार पूर्व विभागातून आहेत.
इंधन भेसळीमुळे धूरप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) नसलेल्या वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे. यामध्ये पाच वर्षांपेक्षा जुनी आणि भेसळ असलेले इंधन वापरणारी वाहने रडारवर असतील. एमपीसीबी, वाहतूक पोलिस आणि पालिकेच्या संयुक्त बैठकीत कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.
वॉर्ड स्वच्छ कचरा अंगण न ठेवणे जाळणेए १०, ००० रु. ० बी ८००० ० सी २०, ३०० ० एफ उत्तर १४,००० ० एफ दक्षिण ३३,००० ० जी उत्तर १५,००० ० जी दक्षिण २००० ० एच पूर्व ६१,००० १३,५००एच पश्चिम ४२,००० ० के पूर्व ११,००० ० के पश्चिम २०,००० ० पी उत्तर ४८,००० ३०००पी पूर्व ७२,००० ० पी दक्षिण १०,००० १०००एम पूर्व ४१,००० ५००० एम पश्चिम १,३०,००० २०००एन ८०,८०० ० एस १९,००० २०००टी २०,००० २०००आर मध्य ३०,००० ४०००आर उत्तर ३००० ० एकूण ६,९०,१०० रु. ३२,५००