Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डेटूर'चा दुसरा दिवस सुपरहिट! कला आणि मनोरंजनाचा अनोखा 'महासंगम', सेलिब्रिटींसोबत धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:28 IST

'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर'चा दुसरा दिवस अत्यंत उत्साहात पार पडला.

'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर'चा दुसरा दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. क्रिएटिव्हीटी, टॅलेंट आणि मनोरंजन क्षेत्रातल्या दिग्गजांच्या उपस्थितीने संपूर्ण कॅम्पसमध्ये आनंदाचं वातावरण होतं.  विद्यार्थी, परीक्षक आणि प्रेक्षकांमुळे स्पर्धात्मक चुरस आणि कलात्मक अभिव्यक्तीचा एक सुंदर समतोल पाहायला मिळाला.

'डेटूर'मध्ये कलात्मक सादरीकरणाची मेजवानी आहे. दिवसाची सुरुवात 'डान्स + ड्रामा' या मुख्य इव्हेंटने झाली, जिथे कलाकारांनी नृत्य आणि अभिनयाची सांगड घालत प्रेक्षकांच्या काळजाला भिडणाऱ्या कथा सादर केल्या. 'शॉर्ट फिल्म' विभागात विद्यार्थ्यांच्या कल्पक कथा आणि नव्या दृष्टिकोनाचे दर्शन घडलं. तर 'बँड' आणि 'डीजे' इव्हेंट्सनी वातावरणात नवा जोश पाहायला मिळाला, ज्यामुळे संपूर्ण परिसर एका कॉन्सर्टमध्ये रूपांतरित झाला होता.

तरुणाईचा बेधडक आत्मविश्वास

सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच 'जनरल इव्हेंट्स'मध्येही विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली. 'मॉक कोर्टरूम' स्पर्धेत विद्यार्थ्यांचा युक्तिवाद आणि सादरीकरण वाखाणण्याजोगं होतं. कॅरिकेचर स्पर्धेत विनोदबुद्धी आणि कलेचा सुरेख संगम दिसला. रॅप बॅटल्समध्ये तरुणाईचा बेधडक आत्मविश्वास पाहायला मिळाला, तर 'क्विझ' स्पर्धेने उपस्थितांच्या बुद्धिमत्तेची कसोटी पाहिली.

दिग्गज परीक्षकांची उपस्थिती 

'डेटूर' या महोत्सवाला राहुल ढोलकिया, रिमा माया, हरमन सिंघा, ऋषभ वाला, आयेशा खान, विवान शाह, देविका वत्सा, आसा सिंग आणि प्रतीक्षा श्रीवास्तव यांसारख्या नामवंत परीक्षकांनी हजेरी लावली. त्यांच्या मार्गदर्शनातून स्पर्धकांना खूप काही शिकायला मिळालं.

'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री'ची विशेष झलक

मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' या आगामी प्रोजेक्टचं प्रमोशन. यावेळी अभिनेता करण टॅकर, अर्शद सय्यद, सलोनी बात्रा आणि दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी झालेल्या गप्पांनी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली. 'डेटूर'च्या दुसऱ्या दिवसाने हा महोत्सव केवळ स्पर्धा नसून क्रिएटिव्हीटी आणि सहकार्याचा एक मोठा मंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

 राणी मुखर्जीची एन्ट्री अन् विद्यार्थ्यांचा कल्ला

'द विंगमॅन शो' ही अनोखी थीम घेऊन आलेल्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलीवूडची 'क्वीन' राणी मुखर्जीने हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. आपल्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने 'डेटूर'च्या मंचावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 'रो-टॉक्स' सोबतच्या या विशेष सत्रात राणीने आपल्या आठवणींना उजाळा दिला, गाणी गायली आणि विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्रही दिला. राणीला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात तिचं स्वागत केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Jay Hind College's 'Detour' Fest Day Two: Art, Fun, Celebrities!

Web Summary : Jay Hind College's 'Detour' fest's second day was a hit, showcasing student talent in dance, drama, film, and music. Celebrities and judges inspired students. Rani Mukerji's surprise visit added to the excitement.
टॅग्स :मुंबईमहाविद्यालयविद्यार्थी