Join us

नामांकित खासगी डॉक्टर आता पालिकेच्या आरोग्य सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 06:08 IST

मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांत लवकरच मुंबई शहर उपनगरातील नामांकित डॉक्टर रुजू होणारआहेत. खासगी रुग्णालयांमध्येसेवा देणारे डॉ. मुफज्जल ...

मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांत लवकरच मुंबई शहर उपनगरातील नामांकित डॉक्टर रुजू होणारआहेत. खासगी रुग्णालयांमध्येसेवा देणारे डॉ. मुफज्जल लकडावाला, डॉ. संजय बोरुडे,डॉ. नीता वर्ती, डॉ. अमित मायदेव आणि डॉ. सुलतान प्रधान या दिग्गजांना लवकरच पालिकेच्या आरोग्य सेवेशी जोडण्याचा प्रशासनाचा मानस आहे.डॉ. संजय बोरुडे हे बॅरिएट्रीक सर्जन आहेत, तर डॉ. नीता वर्ती रहेजा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. तसेच डॉ. प्रधान प्रिन्स अली खान, ब्रीच कॅण्डी या रुग्णालयात सेवा देतात. तर डॉ. मायदेव पोटविकारतज्ज्ञ म्हणून ग्लोबल रुग्णालयात कार्यरत आहेत.या डॉक्टरांना केईएम, सायन आणि नायर रुग्णालयांत विविध विभागांमध्ये जोडून घेऊन रुग्णसेवेला बळकटी देण्याचा पालिकेचा विचार आहे. ही संकल्पना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपआयुक्त अश्विनी जोशी यांची आहे.

टॅग्स :डॉक्टरमहाराष्ट्र