Deputies sentenced to death for sexual assault in Bhandup | भांडुपमध्ये लैंगिक अत्याचारानंतर मुलीची हत्या करणाऱ्याची रवानगी कोठडीत

भांडुपमध्ये लैंगिक अत्याचारानंतर मुलीची हत्या करणाऱ्याची रवानगी कोठडीत

मुंबई : भांडुपमधून अपहरण करण्यात आलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची गळा आवळून निर्घृणपणे हत्या करत नराधमाने मृतदेह नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. अजित कुमार रॉय (३१) असे या विकृताचे नाव आहे. या प्रकारानंतर त्याने नव्या सावजाच्या शोधात पुन्हा घटनास्थळ गाठले. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सोमवारी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
भांडुप पश्चिमेकडील सोनापूर परिसरात १० वर्षीय मुलगी आई-वडिलांसह राहते. ५ तारखेला ती घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली. शोधाशोध करूनही ती न सापडल्याने कुटुंबाने भांडुप पोलिसांत तक्रार दिली. तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यात, अजितच्या मागे मुलगी जाताना दिसली. त्यानुसार, पोलिसांनी ते सीसीटीव्ही शेअर केले. पोलीस तपास सुरू असतानाच एका मुलीचा कुजलेला मृतदेह शुक्रवारी विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील एका नाल्यात बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तो शवविच्छेदनसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला.
लैंगिक अत्याचारानंतर केल्यानंतर गळा आवळून तिची हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. तर पोलीस तपासात भांडुपमधून बेपत्ता झालेल्या मुलीचा हा मृतदेह असल्याचे उघड झाले. त्यानुसार भांडुप पोलिसांनी हत्या, बलात्कार, पुरावे नष्ट करणे, पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत शोध सुरु केला. त्याच सायंकाळी अजित नव्या सावजाच्या शोधात सोनापूर परिसरात गेला. स्थानिकांची नजर त्याच्यावर जाताच त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस चौकशीअंती त्याचाच यामागे हात असल्याचे स्पष्ट होताच त्याला रविवारी अटक केली. सोमवारी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत अधिक तपास सुरू आहे. तसेच घटनाक्रमाबाबतही शहानिशा सुरू असल्याचे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाम शिंदे यांनी दिली.
>गळा आवळून निर्घृण हत्या
अजित हा वडाळा येथील रहिवासी असून मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. ५ तारखेला त्याने मुलीला बोलण्यात गुंतवून स्वत:सोबत नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर त्याने तिची गळा आवळून निर्घृण हत्या केली.
>यापूर्वीही एका मुलीला नेण्याचा प्रयत्न
अजितने २ तारखेलादेखील एका मुलीला सोबत नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलीच्या प्रसंगावधानामुळे ती सुखरूप घरी परतली. मुलगी परत मिळाल्याने पोलीस हेलपाटा नको म्हणून कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली नसल्याचे स्थानिक अफसल शकीलउद्दीन यांनी सांगितले. पहिला गुन्हा पचला. त्यात, दुसराही लक्षात येणार नाही, म्हणून तिसºया सावजाच्या शोधात तो पुन्हा सोनापूर परिसरात आला आणि आमच्या तावडीत सापडला, असा आरोप स्थानिकांकडून होत आहे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deputies sentenced to death for sexual assault in Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.