‘वंदे भारत’साठी जोगेश्वरीत डेपो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 05:14 IST2025-11-11T05:13:51+5:302025-11-11T05:14:09+5:30
Vande Bharat News: वंदे भारत आणि वंदे स्लीपर ट्रेनच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वर टर्मिनसजवळ डेपो उभारण्यात येणार आहे. सध्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्टेशनदरम्यान टर्मिनसचे काम सुरू आहे.

‘वंदे भारत’साठी जोगेश्वरीत डेपो !
मुंबई - वंदे भारत आणि वंदे स्लीपर ट्रेनच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वर टर्मिनसजवळ डेपो उभारण्यात येणार आहे. सध्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्टेशनदरम्यान टर्मिनसचे काम सुरू आहे. त्यामुळे डेपोसाठी जागा निश्चित करण्यात अडचणी येत असून, हे काम पूर्ण झाल्यावर डेपोचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काय होईल जोगेश्वरी टर्मिनस झाल्यावर?
मुंबईच्या उपनगरांतील प्रवाशांसाठी अतिरिक्त मेल / एक्स्प्रेस गाड्यांची सुविधा मिळणार आहे.
या टर्मिनसवर तीन मार्गिका असणार आहेत, ज्यांद्वारे १२ मेल / एक्स्प्रेस चालवल्या जातील.
नव्या डेपोची गरज कशासाठी?
भविष्यात सर्वच मार्गांवर वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, त्यांची देखभाल, दुरुस्तीसाठी मुंबईमध्ये वेगळा डेपो नाही. त्यासाठी पश्चिम रेल्वे आत्ताच तरतूद करत असून, भविष्यात होणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी हा डेपो उभारण्याचे नियोजन करत आहे.
गाड्यांची खास देखभाल
भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेस या उच्च-तंत्रज्ञानाच्या गाड्यांची देखभाल आता अत्याधुनिक पद्धतीने केली जात आहे. पारंपरिक एक्स्प्रेस ट्रेनच्या तुलनेत या गाड्यांसाठी स्वतंत्र व आधुनिक डेपो उभारण्यात आले असून, देखभालीच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता आणि स्वयंचलित प्रणालींचा वापर केला जातो.