अयशस्वी अर्जदारांना दहा दिवसांत म्हाडाची अनामत रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 04:22 IST2019-05-13T04:22:08+5:302019-05-13T04:22:17+5:30

म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या मुंबईतील २१७ घरांच्या लॉटरीमध्ये अयशस्वी अर्जदारांना दहा दिवसांच्या आत अनामत रक्कम परत मिळणार असल्याचे म्हाडामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

 The deposit amount for the failed applicants within 10 days | अयशस्वी अर्जदारांना दहा दिवसांत म्हाडाची अनामत रक्कम

अयशस्वी अर्जदारांना दहा दिवसांत म्हाडाची अनामत रक्कम

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या मुंबईतील २१७ घरांच्या लॉटरीमध्ये अयशस्वी अर्जदारांना दहा दिवसांच्या आत अनामत रक्कम परत मिळणार असल्याचे म्हाडामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३२ हजार ८२ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. पण फक्त २१७ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्ज करण्यासाठी अजूनही अकरा दिवस शिल्लक असल्याने या अर्जांमध्ये आणखी १० हजार अर्जांची भर पडेल असा विश्वास म्हाडाला आहे.
म्हाडाने जाहीर केलेल्या लॉटरीसाठी रविवारी सायंकाळपर्यंत १ लाख ७७ हजार १९१ जणांनी नोंदणी केली होती.

Web Title:  The deposit amount for the failed applicants within 10 days

टॅग्स :mhadaम्हाडा