Join us

अंधेरीच्या डीमार्टला आता कुपन सिस्टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:00 IST

डीमार्ट समोरील छत्रपती संभाजीनगरमधील दोन सोसायटीत ३ कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

मुंबई : अंधेरी (पूर्व) डीमार्ट बाहेर मध्यरात्री सामान खरेदीसाठी होणारी प्रचंड गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही नियम पाळले जात नाहीत. त्यातच डीमार्ट समोरील छत्रपती संभाजीनगरमधील दोन सोसायटीत ३ कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.‘लोकमत’ने सातत्याने १२, १४ व २७ रोजी वृत्त देऊन याला वाचा फोडली. ‘लोकमत’च्या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या. लोकमतच्या आलेल्या या बातम्यांची दखल शिवसेनेने घेतली. विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, नगरसेवक संदीप नाईक व उपविभागप्रमुख अनिल खांडेकर यांनी याबाबत येथील डीमार्टच्या प्रशासनाबरोबरच चर्चा केली. आपण येथे किराणा घेणाऱ्या नागरिकांसाठी कुपन सिस्टीम चालू करावी, जेणेकरून गर्दी होणार नाही. या सर्व गोष्टी अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच के पूर्व प्रभाग समिती अध्यक्ष सुनील यादव यांच्याबरोबरदेखील चर्चा केली, अशी माहिती डिचोलकर यांनी दिली.>‘लोकमत’लादिले धन्यवाद‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. आजपासून येथे टोकन सिस्टीम चालू करण्यात आली आहे. अंधेरी डीमार्ट २४ तास खुले राहील. एकावेळी ३० जणांना आतमध्ये सोडण्यात येईल व टप्प्याटप्प्याने कुपन देण्यात येणार आहे, अशी ग्वाही डीमार्ट व्यवस्थापनाने दिली. येथील डीमार्टच्या समस्येची ‘लोकमत’ने दखल घेतल्याबद्दल व संभाजीनगरवासीयांना दिलासा दिल्याबद्दल नितीन डिचोलकर यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस