Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 00:54 IST

तक्रारदार कंत्राटदार हे विलेपार्ले परिसरात राहतात.

मुंबई : विलेपार्ले येथील एका ठेकेदाराला व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे २५ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. त्याने त्याकडे दुर्लक्ष करताच त्याच्या मुलीचे फोटो पाठवून ठार मारण्याची धमकी देत, त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर अश्लील फोटो पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार कंत्राटदार हे विलेपार्ले परिसरात राहतात. १८ सप्टेंबरपासून त्यांना अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी वारंवार संदेश येऊ लागले. तक्रारदाराने दुर्लक्ष करताच, त्यांना मुलीचा फोटो पाठवून ठार मारण्याची धमकी दिली. कंत्राटदाराच्या पत्नीच्या मोबाइलवर केलेला फोन उचलला नाही, म्हणून त्यांना अश्लील फोटो पाठविले. हा प्रकार असह्य झाल्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार जुहू पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :व्हॉट्सअ‍ॅप