गिरिराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By Admin | Updated: April 5, 2015 22:43 IST2015-04-05T22:43:07+5:302015-04-05T22:43:07+5:30

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर वर्णद्वेषी असल्याचा

The demand for filing a complaint against Giriraj | गिरिराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गिरिराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भार्इंदर : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा
सोनिया गांधी यांच्यावर वर्णद्वेषी असल्याचा आरोप केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे मीरा-भार्इंदर जिल्हा सचिव राजकुमार मिश्रा व जिल्हा युवा अध्यक्ष राकेश राजपुरोहित यांनी केली आहे.
त्यानुसार काँग्रेसच्या स्थानिक शिष्टमंडळाने नवघर पोलिसांना निवेदन देत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी डी.पी. सिंह, सुधाकर भगत, राहुल पारीख आदी उपस्थित होते. निवेदनाचा स्वीकार करून स्थानिक पोलिसांनी ते योग्य त्या कारवाईसाठी वरिष्ठांकडे सुपूर्त करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
(प्रतिनिधी)

Web Title: The demand for filing a complaint against Giriraj