Join us

नेपाळच्या तरुणीवर दिल्लीत सामूहिक बलात्कार; ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 01:53 IST

नेपाळहून मुंबईला निघालेल्या तरुणीला प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे महागात पडले. तिच्यावर चार जणांनी दिल्लीच्या द्वारका परिसरात सामूहिक बलात्कार केला.

मुंबई : नेपाळहून मुंबईला निघालेल्या तरुणीला प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे महागात पडले. तिच्यावर चार जणांनी दिल्लीच्या द्वारका परिसरात सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी मुंबईत आल्यावर तिने ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर घडला प्रकार उघडकीस आला.सुमी (नावात बदल) ही २२ वर्षांची तरुणी मुंबईत राहणाऱ्या तिच्या भावाला भेटण्यासाठी नेपाळहून दोन दिवसांपूर्वी निघाली होती. नेपाळहून दिल्लीला ती बसने आली. तिला तिथून मुंबईत जाणारी गाडी पकडायची होती. मात्र प्लॅटफॉर्मवर पोहोचायलाच तिला उशीर झाला. त्या वेळी एका इसमाने तिची चौकशी सुरू केली. रात्री उशिरा प्लॅटफॉर्मवर राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत तो तिला सोबत द्वारका परिसरात घेऊन गेला. त्याच्यावर विश्वास ठेवत ती त्याच्यासेबत गेली. तेथे त्या इसमासह चौघांनी सुमीवर बलात्कार केला, असे तिने ओशिवरा पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर तिने कशीबशी मुंबईत जाणारी गाडी पकडली. गोरेगावमध्ये राहणाºया तिच्या भावाकडे पोहोचली. घडलाप्रकार तिने भावाला सांगितला; आणि त्याने तिला ओशिवरा पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली.दिल्ली पोलिसांकडे प्रकरण करणार वर्गओशिवरामध्ये झीरो झीरोवर गुन्हा दाखल करीत पोलिसांनी सुमीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे अहवालात सिद्ध झाल्याचे समजते. ओशिवरा पोलिसांनी सुमीचा जबाब नोंदविला असून, हे प्रकरण आता पुढील चौकशीसाठी दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक महितीसाठी ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :गुन्हेगारी