Join us

रविवारी खोळंबा! देखभाल, दुरुस्तीसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:31 IST

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. 

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा रविवारी खोळंबा होणार आहे. ब्लॉक कालावधीत मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाही.

मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०:५५ ते दुपारी ३:३५ पर्यंत तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ असा मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लोकल डाऊन जलद मार्गावर धावणार असून त्या  भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील, आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकबोरिवली आणि गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावर विशेष लाेकल धावणार हार्बर मार्गावरील ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० पर्यंत पनवेल/ बेलापूर/ वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि डाऊन मार्गावरील सेवा सकाळी १०:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत बंद राहणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

टॅग्स :मुंबई लोकलरेल्वे