मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, कुर्ला-सायनदरम्यान रेल्वे रूळाला तडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 10:19 IST2019-01-24T09:56:34+5:302019-01-24T10:19:49+5:30
कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, कुर्ला-सायनदरम्यान रेल्वे रूळाला तडा
ठळक मुद्देमध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीतकुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान रूळाला तडा
मुंबई - मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बिघाडामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. डोंबिवली, कल्याण स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे. अप मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू असून रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळी सुरू आहे.
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला-सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा #CentralRailway#local
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 24, 2019