विसर्जनाच्या क्रेनचे पट्टे सुटल्याने घडला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 21:23 IST2018-09-24T21:22:11+5:302018-09-24T21:23:15+5:30
सागर चंदेलिया आणि रफिक शेख असे जखमी जीवरक्षकांची नावे आहेत.

विसर्जनाच्या क्रेनचे पट्टे सुटल्याने घडला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबई - मुंबई उपनगरातील महत्त्वाचे गणपती विसर्जन हे पवई तलावात क्रेनच्या सहाय्याने होत असताना क्रेनचे पट्टे सुटल्याने झालेल्या अपघात घडला. या अपघातात दोनजण किरकोळ जखमी झाले. सागर चंदेलिया आणि रफिक शेख असे जखमी जीवरक्षकांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे. या दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. भांडुपेश्वर तलावात तरुणाचा बुडून मृत्यू तर दुसरीकडे पवई तलावात झालेली ही घटना हे दोन्ही तलाव पालिकेच्या एस वार्डच्या हद्दीत येतात. यामुळे नागरिक पालिका प्रशासनाच्या पूर्वनियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.