रेल्वेमुळे रखडले डिलाइल पुलाचे काम - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 05:42 IST2022-04-11T05:42:06+5:302022-04-11T05:42:33+5:30
डिलाइल पूल उड्डाणपुलाचे काम लवकर व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असले तरी त्याला रेल्वेकडून विलंब होत आहे.

रेल्वेमुळे रखडले डिलाइल पुलाचे काम - आदित्य ठाकरे
मुंबई :
डिलाइल पूल उड्डाणपुलाचे काम लवकर व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असले तरी त्याला रेल्वेकडून विलंब होत आहे. त्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करूनही उत्तर आलेले नाही. त्यामुळे कोणत्या तांत्रिक कारणामुळे कामाला विलंब केला जात आहे. ते रेल्वे प्रशासनाने स्पष्ट करावे, असे आवाहन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी केले.
लोअर परळ रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेकडून बांधण्यात येत असलेल्या डिलाइल रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची आणि तेथे महापालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या पोहोच रस्त्यांच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी आ. सुनील शिंदे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, माजी मंत्री सचिन अहिर आदी उपस्थित होते.