Join us

६ डिसेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करा - वर्षा गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 06:23 IST

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात.

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच, ६ डिसेंबर रोजी मुंबईत सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रा.वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, या दिवशी सर्व कार्यालये सुरू असल्याने, अनेकांना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. त्यातच ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी समन्वय समितीने मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची शिफारस शासनाला केल्याचे प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :वर्षा गायकवाड