BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील उमेदवारीवरून सुरू असलेले अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांनी थेट आमदार आणि खासदारांसमोरच आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. १० वर्षे पक्षासाठी रक्त आटवलं, मग माझं चुकलं कुठे? अशा शब्दात भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने पक्ष नेतृत्वाला धारेवर धरले.
"मला बोलू द्या, कुणीही थांबवू नका!"
दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ मधून भाजपने नुकताच पक्षात प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आह आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तातडीने उमेदवारी मिळाल्याने स्थानिक इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप महिला कार्यकर्ता मेळाव्यात हा राडा पाहायला मिळाला. व्यासपीठावर आमदार मनीषा चौधरी आणि खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित असतानाच एका इच्छुक महिला कार्यकर्त्याने माईक हातात घेऊन जाब विचारण्यास सुरुवात केली.
"तेजस्वी घोसाळकर यांना आपल्या पक्षाने उमेदवारी जाहीर केलीय त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. गेली १० वर्षे दहिसर मतदारसंघात काम करते आहे. रात्रंदिवस आम्ही काम केलं. कुठे चुकले ओ मी. मी पक्षाचा आदर करते. त्यांनी जो उमेदवार दिलाय त्याला बहुमताने निवडून आणायचे काम माझं आहे. परंतु मी कुठे चुकले याचं उत्तर मला आमदार मनीषा चौधरी आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून हवं आहे. आयुष्यभर ज्यांना मी गुरु मानलं त्यांनी मला अंधाराची दिशा दाखवली. त्याबद्दल मी नाराज आहे," असं म्हणत महिलेने आपली खदखद बोलून दाखवली.
खोट्या मुलाखती आणि निव्वळ फार्स
यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या निवड प्रक्रियेवरही गंभीर आरोप केले. "कार्यकर्ता पक्षासाठी समर्पित असतो. महिला गॅस बंद करुन पळतात. पुरुष नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळत असतात. यांनी आपल्या बरोबर काय केलं. खोट्या मुलाखती, खोटे फॉर्म भरुन घेतले, असंही महिलेने म्हटलं.
तेजस्वी घोसाळकर यांची उमेदवारी आणि गुप्तता
मुंबई महापालिकेसाठी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस उरले असताना, महायुतीमधील अनेक जागांचा तिढा सुटलेला नाही. रविवारी रात्रीपर्यंत अनेक बड्या नेत्यांनाही एबी फॉर्म मिळालेले नव्हते. मात्र, दहिसर प्रभाग २ साठी तेजस्वी घोसाळकर यांना भाजपने ग्रीन सिग्नल दिला आणि त्यांनी सोमवारी अर्ज भरण्याचे नियोजनही जाहीर केले. पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळेच जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे.
Web Summary : Dahisar BJP workers protest new candidate Tejaswi Ghosalkar's nomination. Loyalists question leadership, citing years of service overlooked. Accusations of unfair selection process surface.
Web Summary : दहिसर भाजपा कार्यकर्ताओं ने नई उम्मीदवार तेजस्वी घोसालकर के नामांकन का विरोध किया। निष्ठावानों ने नेतृत्व पर सवाल उठाए, वर्षों की सेवा को अनदेखा किया गया। अनुचित चयन प्रक्रिया के आरोप लगे।