रो पॅक्स सेवेद्वारे बससेवा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:33 AM2020-01-19T03:33:36+5:302020-01-19T03:33:59+5:30

भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या रो पॅक्स, रोल  ऑन रोल ऑफ (रो रो) सेवेला १५ फेब्रुवारीपर्यंत प्रारंभ करण्यात येईल. यासाठी लागणारे जहाज मुंबईकडे रवाना झाले आहे.

Decision to start bus service through Ro Pax service soon | रो पॅक्स सेवेद्वारे बससेवा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

रो पॅक्स सेवेद्वारे बससेवा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

Next

मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या रो पॅक्स, रोल  ऑन रोल ऑफ (रो रो) सेवेला १५ फेब्रुवारीपर्यंत प्रारंभ करण्यात येईल. यासाठी लागणारे जहाज मुंबईकडे रवाना झाले आहे. मध्यंतरी वातावरण प्रतिकूल असल्याने हे जहाज वेळेत पोहोचू शकले नाही. नियोजनाप्रमाणे हे जहाज २६ जानेवारीपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता होती. आता हे जहाज मुंबईत दाखल झाल्यावर १५ फेब्रुवारीपर्यंत ही सेवा सुरू होईल, असा विश्वास महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला.

दिवाळीदरम्यान मुंबई ते मांडवा या जलमार्गाद्वारे सुमारे ४० ते ४५ हजारपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे हा मार्ग पर्यटकांच्या व प्रवाशांच्या पसंतीस उतरणारा असून रो पॅक्स सेवा सुरू झाल्यावर अधिक प्रवासी या मार्गाकडे वळतील. या सेवेला मिळणारा प्रतिसाद व या मार्गाला जोडणाºया भागांमध्ये जाणाºया प्रवाशांचे प्रमाण पाहून या ठिकाणी बससेवादेखील उपलब्ध करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळी, ख्रिसमस, नववर्ष अशा विविध प्रसंगी या ठिकाणाहून जलमार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असते. त्यांना सुविधा पुरवण्यासाठी बससेवेचा पर्याय उपलब्ध असल्याचे डॉ. रामास्वामी यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या पूर्वतयारीची इतर कामे पूर्ण झाली असून केवळ जहाजाची प्रतीक्षा केली जात आहे. सुमारे ५० कोटी रुपये किमतीचे हे जहाज असून, त्यामध्ये एका वेळी १०० ते १२० चार चाकी वाहने, ५०० प्रवासी व १८ ते २० बस वाहून नेता येणे शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला प्रकल्प असून, या माध्यमातून पर्यावरणाची हानी कमी होईल व प्रवाशांच्या प्रवास वेळेतदेखील मोठी बचत होईल, असे डॉ. रामास्वामी म्हणाले. इतकी क्षमता असलेला हा राज्यातील सर्वांत मोठा रो पॅक्स प्रकल्प असून, एम२एम या खासगी चालकाद्वारे चालवण्यात येणार आहे. या प्रवासासाठी तिकीटदराबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

५० कोटी रुपयांचे जहाज

सुमारे ५० कोटी रुपये किमतीचे हे जहाज असून, त्यामध्ये एका वेळी १०० ते १२० चार चाकी वाहने, ५०० प्रवासी व १८ ते २० बस वाहून नेता येणे शक्य होणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला प्रकल्प असून, या माध्यमातून पर्यावरणाची हानी कमी होईल व प्रवाशांच्या प्रवास वेळेतदेखील मोठी बचत होईल़ हा जगातील सर्वांत मोठा रो पॅक्स प्रकल्प असून, एम२एम या खासगी कंपनीद्वारे चालविण्यात येणार आहे़

Web Title: Decision to start bus service through Ro Pax service soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई