‘सोहराबुद्दीन’ चकमक प्रकरणी आज फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 05:30 IST2018-09-10T05:29:51+5:302018-09-10T05:30:06+5:30

सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी आणि तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणात गुजरात आणि राजस्थानचे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोपमुक्त करण्यास पात्र आहेत की नाही, याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय सोमवारी देण्याची शक्यता आहे.

Decision in the case of 'Sohrabuddin' encounter today | ‘सोहराबुद्दीन’ चकमक प्रकरणी आज फैसला

‘सोहराबुद्दीन’ चकमक प्रकरणी आज फैसला

मुंबई : सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी आणि तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणात गुजरात आणि राजस्थानचे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोपमुक्त करण्यास पात्र आहेत की नाही, याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय सोमवारी देण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पाच फेरविचार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.  सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी गुजरात, राजस्थानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणा-या पाच याचिकांवरील सुनावणी सोमवारी पूर्ण झाल्याने उच्च न्यायालयाने या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला आहे. न्या. ए.एम. बदर यांच्या खंडपीठापुढे या पाचही याचिकांवरील सुनावणी जुलैमध्ये पूर्ण झाली.
सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने राजस्थानचे आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन आणि दिनेश एम.एन तसेच गुजरातचे माजी एटीएस प्रमुख डी. जी वंजारा यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचसोबत या बनावट चकमक प्रकरणी सीबीआयने गुजरात पोलीस अधिकारी एन.के. आमीन व राजस्थानचे पोलीस हवालदार दलपतसिंग राठोड यांच्या आरोपमुक्ततेलाही आव्हान दिले आहे.

Web Title: Decision in the case of 'Sohrabuddin' encounter today