Join us  

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मेट्रोच्या 'या' मार्गावरील विस्तारीकरणाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 3:31 PM

सध्या मुंबईत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला शासकीय परवानग्या आणि निधीची तरतूदही जलद गतीने करण्यात येत आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रोच्या मार्गासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले आहेत.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील अनेक प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबईमेट्रोच्याही नवीन मार्गांच्या विस्ताराला मान्यता देण्यात आली. त्यानुसार मुंबई मेट्रो 9, मुंबई मेट्रो 7 म्हणजेच मेट्रो 7 महामार्गाच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी 6607 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. तसेच मुंबई मेट्रो 9 साठी निधी उभारण्यास एमएमआरडीएला विशेष अधिकारही दिले आहेत. इतर मार्गिकांप्रमाणेच समर्पित नागरी परिवहन निधी उभारण्यास ही मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोच्या या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 13.581 किलो मीटर असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम अधिक गतीने होणार आहे. 

* असा असेल मुंबई मेट्रो मार्ग 9दहीसर ते मीरा भाईंदर लांबी - 10.41 किमीस्थानके - 11 पूर्णत: - उन्नत मार्ग

* मुंबई मेट्रो 7 अअंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलांबी - 3.175 किमी0.98 किमी उन्नत मार्ग 2.215 किमी भुयारी मार्गिका 

टॅग्स :मेट्रोमुंबईदेवेंद्र फडणवीस