Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाडमध्ये झाड पडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 10:35 IST

शैलेश राठोड (३५) असे मृत तरुणाचे नाव

ठळक मुद्देपालिकेकडून वाढलेल्या फांद्यांची वेळीच छाटणी न करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे. मालाडच्या नाडीयाद वाला कंपाउंडमध्ये आज सकाळी हा प्रकार घडला.

मुंबई - झाडाची फांदी कोसळून त्यात एक गंभीर जखमी झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. शैलेश राठोड (३५) असे  मृत तरुणाचे नाव असून मालाडच्या नाडीयाद वाला कंपाउंडमध्ये आज सकाळी हा प्रकार घडला. राठोड हा याच परिसरात राहत असून मंदिरात पुजा करुन परतत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. पालिकेकडून वाढलेल्या फांद्यांची वेळीच छाटणी न करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे. हा प्रकार घडल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सूरु केले आहे.

टॅग्स :मृत्यूनगर पालिका