लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: September 30, 2014 21:39 IST2014-09-30T21:39:45+5:302014-09-30T21:39:45+5:30

लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू

The death of a woman in the dock | लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू

लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू

कलच्या धडकेत महिलेचा मृत्यू
मुंबई : सोमवारी रात्री रेल्वेरूळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बोरीवली स्टेशनजवळ घडली. मनीषा पांडे असे मृत महिलेचे नाव असून, ती कांदिवली परिसरात राहते. या प्रकरणी आता बोरीवली रेल्वे लोहमार्ग पोलीस तपास करीत आहेत.
मनीषा ही महिला कांदिवलीच्या काजुपाडा परिसरात पतीसोबत राहत होती. ती गेल्या काही दिवसांपासून निराश होती. सोमवारी सकाळी मनीषाचा पती कामावर गेला होता. तो सायंकाळी कामावरून घरी आला तेव्हा दरवाजा बंद होता. त्यानंतर त्याने मनीषाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, रात्री ११ वाजताच्या सुमारास कांदिवली-बोरीवली रेल्वेरूळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून मनीषा जखमी झाली. हा अपघात आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस करीत आहेत. जखमी अवस्थेत पोलिसांनी मनीषाला उपचाराकरिता कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रु ग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी मनीषाला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)

Web Title: The death of a woman in the dock