जुहूच्या समुद्रात दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 17, 2015 01:13 IST2015-08-17T01:13:02+5:302015-08-17T01:13:02+5:30

जुहूच्या समुद्रकिनारी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, नाजिरुद्दीन कम्रूद्दीन पटेल (२०) आणि प्रसाद मनोहर जाधव (१५) अशी दुर्घटनेतील मृतांची

The death of the two in Juhu Sea | जुहूच्या समुद्रात दोघांचा मृत्यू

जुहूच्या समुद्रात दोघांचा मृत्यू

मुंबई : जुहूच्या समुद्रकिनारी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, नाजिरुद्दीन कम्रूद्दीन पटेल (२०) आणि प्रसाद मनोहर जाधव (१५) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी जुहू समुद्रकिनारी दोन मुले बुडाल्याची माहिती महापालिका नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यापैकी एका मुलास अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या मुलाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र
तो सापडला नाही. रविवारी सकाळी
दुसरा मुलगा स्थानिक पोलीस आणि नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर आढळला. त्याला कूपर रुग्णालयात दाखल
केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे त्याला मृत घोषित करण्यात
आले. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the two in Juhu Sea