लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या सुरक्षेसाठी मालाड-मालवणीतील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेतल्याबद्दल स्थानिक काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आपणास संपविण्याची धमकी दिली, असा आरोप राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. याबाबत पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली. मालवणीमधील कथित रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम सुरू केली आहे त्यामुळे धमकी दिली, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आमदार अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो झाला नाही.
कारवाई सुरूच राहील
मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असताना आ. शेख अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालून सुरक्षेशी खेळत आहेत. घुसखोर आणि अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल, असे मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
Web Summary : Minister Mangalprabhat Lodha alleges Congress MLA Aslam Sheikh threatened him for opposing Rohingya and Bangladeshi infiltrators in Malvani. Lodha filed a police complaint, vowing to intensify action against illegal constructions jeopardizing Mumbai's security. Sheikh's response is awaited.
Web Summary : मंत्री मंगलप्रभात लोढ़ा का आरोप है कि कांग्रेस विधायक असलम शेख ने मालवणी में रोहिंग्या और बांग्लादेशी घुसपैठियों का विरोध करने पर उन्हें जान से मारने की धमकी दी। लोढ़ा ने पुलिस में शिकायत दर्ज कराई, मुंबई की सुरक्षा को खतरे में डालने वाले अवैध निर्माणों के खिलाफ कार्रवाई तेज करने का संकल्प लिया। शेख की प्रतिक्रिया का इंतजार है।