चिमुकलीच्या हत्येप्रकरणी तृतीयपंथीला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:39 AM2024-02-28T06:39:12+5:302024-02-28T06:39:20+5:30

पळवून नेऊन अत्याचार; पोक्सो न्यायालयाचा निकाल

Death sentence to third party in case of murder of toddler | चिमुकलीच्या हत्येप्रकरणी तृतीयपंथीला फाशीची शिक्षा

चिमुकलीच्या हत्येप्रकरणी तृतीयपंथीला फाशीची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण करणे आणि त्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या तृतीयपंथीला विशेष  पोक्सो न्यायालयाने मंगळवारी फाशी ठोठावली. पोक्सोच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावण्याची पहिलीच वेळ आहे.

जुलै २०२१ मध्ये कफ परेड परिसरातील खाडीमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पुरलेला आढळला होता. याचदरम्यान तीन महिन्यांची  चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली होती. मुलीच्या पालकांशी वाद झालेल्या कन्हैया चौगुले (२८)  व त्याचा मित्र सोनू काळे (२०) या दोघा तृतीयपंथींना पोलिसांनी तपासानंतर ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यांनी चिमुकलीचे अपहरण करून हत्या केल्याची व त्यानंतर तिचा मृतदेह खाडीत पुरल्याचे कबूल केले. 

पैसे, नारळ, साडी नाही दिली म्हणून राग
nकन्हैया आणि सोनू हे लोकवस्तीत फिरत असताना मुलीच्या घरी गेले. तिथे त्यांनी नवजात मुलीला आशीर्वाद दिला. त्याबदल्यात त्यांनी मुलीच्या पालकांकडून पैसे, नारळ आणि साडी मागितली. मात्र, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांनी मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. 
nत्यानंतर रागात दोघेही निघून गेले.  मध्यरात्रीच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा आहे, असे बघून त्यांनी मुलीचे अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिची हत्या करून मृतदेह खाडीत पुरला होता.

Web Title: Death sentence to third party in case of murder of toddler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.