विक्रोळीत बेस्टच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 05:26 IST2017-11-21T05:26:05+5:302017-11-21T05:26:14+5:30

मुंबई : विक्रोळीत बेस्ट बसच्या धडकेत ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलीस नाईक सचिन महाडिक (३२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली

The death of policeman Vikhroli Best | विक्रोळीत बेस्टच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

विक्रोळीत बेस्टच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

मुंबई : विक्रोळीत बेस्ट बसच्या धडकेत ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलीस नाईक सचिन महाडिक (३२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी बेस्ट बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
विक्रोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा येथील रहिवासी असलेले महाडिक ठाणे एसीबी कार्यालयात कार्यरत होते. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. याच्याच प्रशिक्षणासाठी ते दहा दिवसांच्या सुट्टीवर होते. रविवारी सकाळी मित्र श्रीमंत चव्हाण यांच्यासोबत ते दुचाकीवरून विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरून निघाले. याचदरम्यान भरधाव वेगाने आलेल्या बेस्ट बसने त्यांना धडक दिली. या धडकेत चव्हाण जखमी झाले तर महाडिक यांचा मृत्यू झाला.
महाडिक हे पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलासोबत कळवा परिसरात राहायचे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

Web Title: The death of policeman Vikhroli Best