लालबाग राजा येथील बंदोबस्तादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 10:48 PM2017-09-05T22:48:16+5:302017-09-05T22:55:38+5:30

कर्तव्यावर असताना अजून एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. लालबागचा राजा येथे बंदोबस्तावर असताना एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.  ही घटना सोमवारी घडली. सतीश पांडुरंग साबले (५५)  असे त्यांचे नाव आहे.

Death of policeman during the lockout of Lalbagh King | लालबाग राजा येथील बंदोबस्तादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू 

लालबाग राजा येथील बंदोबस्तादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू 

Next

मुंबई , दि. 5 - कर्तव्यावर असताना अजून एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. लालबागचा राजा येथे बंदोबस्तावर असताना एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.  ही घटना सोमवारी घडली. सतीश पांडुरंग साबले (५५)  असे त्यांचे नाव आहे.  कामाच्या ताणमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात  येत आहे.  
 साबळे हे नायगाव सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होते. सोमवारी सायंकाळी ते L&O-4 गाडीवर लालबाग येथे कर्तव्य बजावत असताना अचानक चक्कर येऊन पडले. अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. मृत्यू मागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे पोलिसांवरील ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील गणेशोत्सव आणि विसर्जनादरम्यान मुंबईत पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Death of policeman during the lockout of Lalbagh King

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.