गोरेगावात इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

By Admin | Updated: August 23, 2015 02:00 IST2015-08-23T02:00:20+5:302015-08-23T02:00:20+5:30

गोरेगाव पश्चिमच्या जवाहरनगर येथे एस.व्ही. रोडजवळ असलेल्या ओमसाई इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून कोसळून मयूर अरविंद शेखावत (२३) या मजुराचा मृत्यू झाला.

The death of a laborer from the building in Goregaon | गोरेगावात इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

गोरेगावात इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

मुंबई : गोरेगाव पश्चिमच्या जवाहरनगर येथे एस.व्ही. रोडजवळ असलेल्या ओमसाई इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून कोसळून मयूर अरविंद शेखावत (२३) या मजुराचा मृत्यू झाला.
या इमारतीचे रंगकाम करताना शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला असून या प्रकरणी पोलिसांनी कासिम खान या कंत्राटदाराला अटक केली. खानने मजुरांना सुरक्षा
बेल्ट पुरविणे गरजेचे होते.
मात्र त्याने याबाबत निष्काळजीपणा केला. ज्यामुळे शेखावतला त्याचा जीव गमवावा लागला, अशी माहिती
गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: The death of a laborer from the building in Goregaon