Join us

सातव्या मजल्यावरून पडून पत्रकाराचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 13:30 IST

मॉर्निंग वॉक करत असताना सातव्या मजल्यावरून पडून पत्रकारचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी मुंबईतील गोरेगावमधील सिद्धर्थनगर परिसरात घडली.

मुंबई - मॉर्निंग वॉक करत असताना सातव्या मजल्यावरून पडून पत्रकारचामृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी मुंबईतील गोरेगावमधील सिद्धर्थनगर परिसरात घडली. आदर्श मिश्रा असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव असून, पत्रकार दिनीच दुर्दैवी प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आदर्श मिश्रा हे आज सकाळी इमारतीच्या टेरेसवर मॉर्निंग वॉक करत होते. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :मुंबईपत्रकारमृत्यू